Top
  >  Blog Featured   >  2022 मध्ये या विशेष ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

2022 मध्ये या विशेष ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

या नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये तुमचा कुठे कुठे फिरायचा बेत ठरलाय? असेल आणि नसेल तरीही इज इंडिया ट्रॅव्हल ला नक्की फॉलो करा कारण आम्ही तुम्हाला बेस्ट ठिकाणे दाखविण्यासाठी नेहमी आनंदी आहोत. बघा खालील ठिकाणे तुमच्यासाठी बेस्ट आहेत कि नाही?

हंपी

कर्नाटकमधील बेल्लोर जिल्ह्यात तुंगभद्रा नदीवर हंपी हे सुंदर ऐतिहासिक ठिकाण आहे. युनेस्कोने या ठिकाणाची वर्ल्ड हेरिटेज म्हणून नोंद केली आहे. १३३६ ते १६४६ या कालखंडात विजयनगरची राजधानी म्हणून हंपी शहराची ओळख होती कालांतराने आक्रमणे होऊन आक्रमणकर्त्यांनी हंपी शहराची नासधूस केली. परंतु येथील कलाकृती या आजही अजरामर आहेत. या ठिकाणी राजा अशोकाचे हस्तलिखित शिलालेख देखील आहेत. या ठिकाणी अनेक महल आणि आकर्षक कलाकृतींची मंदिरे पाहावयास मिळतात. यामध्ये प्रामुख्याने विरुपक्षा, विजय वित्तला, हेमाकुता मंदिर प्रेक्षणीय आहे. राजा कृष्णदेवरायाच्या राजदरबाराचे उंच कोरीव कलाकृतींचे खांब, मोठे मोठे हत्ती घोडे, सुंदर स्त्रियांच्या मुर्त्यांमधून साकारलेली संगीत संस्कृती, तेथील बाजार, येथील पर्यटनाचे मुख्यतः आकर्षण आहे. हजाररामा १५ व्या शतकातील मंदिर आहे. रामायणातील भाग या वस्तूवर सुबक रीतीने कोरलेले आहेत. मानले जाते कि रामायण काळात राम लक्ष्मण, हनुमान आणि सुग्रीव यांची येथे भेट झाली होती.  या मंदिराच्या बाजूला पुरातत्व विभाग संग्रहालय आहे, येथील उत्खननात सापडलेल्या प्राचीन मूर्ती आणि वस्तू प्रेक्षकांना बघण्यासाठी ठेवल्या आहेत. येथील भव्य हत्तीशाळा बघून विजयनगरच्या साम्राज्याचा अंदाज तुम्हाला येईल. महानवमी डिब्बा, एकावर एक दगडांनी रचलेला ‘दगडी रंगमंच’ सुंदर कलाकृती आहे, जेथे तरुण एकत्रित बसून फोटो काढतात. येथील महालाचे खांब हे संगीत निर्माण करणारे आहेत असे म्हटले जाते. त्यांना हात लावल्यानंतर संगीत ऐकू येते.

कोणार्क सूर्य मंदिर

ओरिसामधील पूरीमध्ये कोणार्क सूर्य मंदिर स्थापत्यशास्त्रातले आश्चर्य आहे आणि त्याची रचना एका रथाच्या आकाराची आहे. अनेक प्रकारच्या बारीक कोरीव कलाकृतींनी येथील महाल सजवले आहेत. ज्याचे अनेक गर्भित अर्थ देखील आहेत, म्हणून ते आवर्जून पाहिलंच पाहिजे. पूर्वी हे कलिंग राज्य म्हणून प्रसिद्ध होते. या मंदिराविषयीची कथा सांगितली जाते कि, कृष्णाचा मुलगा संबा हा स्त्रीभोगी होता. श्रीकृष्णाच्या शापामुळे तो महारोगी बनला होता. कटक ऋषींनी त्याला सूर्यदेवाची उपासना केल्यास शापमुक्ती होईल असे सांगितले होते. मग सांबाने चंद्रभागा नदीकिनारी १२ वर्षे तप केली आणि तो शापमुक्त झाला. त्याला चंद्रभागा नदीत सूर्याची मूर्ती मिळाली. त्याने याठिकाणी सूर्य मंदिराची स्थापना केली. कालांतराने पाण्याची पातळी घटल्याने आता हे मंदिर किनाऱ्यापासून काही अंतरावर आहे. या रथाकृती मंदिराला सात घोडे असून ते आठवडय़ाचे दिवस दर्शवतात. चाकांच्या १२ जोडय़ा ज्या रथ ओढतात त्या वर्षांचे महिने, तर प्रत्येक चाकाला आठ आरे असून ते दिवसाची दिनचर्या दर्शविते. या मंदिराच्या मंडपामध्ये चुंबकीय शक्ती होती. त्यामुळे या मंदिराला ब्लॅक पॅगॉडा देखील म्हटले जाते. हे मंदिर बांधण्यासाठी 1200 शिल्पकारांनी 12 वर्षात बनविले होते. येथील नट मंदिर म्हणजेच भोग मंडपामधील प्राचीन कलाकृती लोकप्रिय आहे. सूर्य मंदिराच्या प्रवेशावर सिंह, हत्ती, कामशास्त्रातील शृंगारिक आकृत्या आहेत, तर वरच्या स्तरावर देवादिकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.

अंदमान – सेल्युलर जेल

स्टारफिशच्या आकाराचे ७ विंग असलेले अंदमान मधील सेल्युलर जेल, म्हणजे काळ्या पाण्याच्या शिक्षेच ठिकाण. स्वातंत्र्यसैनिकांनी पळून जाऊ नये म्हणून समुद्राच्या मध्यभागी बांधलेले कारागृह आज एक विशेष राष्ट्रीय स्मारक आहे. स्वातंत्र्यसैनिकांना किती हाल अपेष्टा याठिकाणी सहन कराव्या लागल्या त्याचे पुतळे आणि दंडसामग्री येथे पाहायला मिळते. या जेलमध्ये एकूण ६९४ कोठड्या आहेत जेथे कैद्यांना डांबले जाई. जेलच्या आवारात एक वर्क स्टेशन आहे जेथे कैद्यांना कष्टाची कामे करावी लागायची, त्याचेही हुबेहूब पुतळे तुम्हाला बघायला मिळतील. येथील फाशीगृह खतरनाक आहे. कैद्यांना टॉर्चर करून फाशी दिली जायची. एकंदरीत ब्रिटिशांची क्रूरता आणि स्वातंत्र्यसैनिकांची सहनशीलता आणि पराकाष्ठा यांचा अंदाज तुम्हाला या जेलमध्ये येईल, प्रत्येक देशप्रेमीने या ठिकाणाला एकदा तरी भेट दिली पाहिजे.

फुलांची दरी आणि नंदा देवी राष्ट्रीय उद्यान

उत्तराखंडमधील हि दोन्हीही ठिकाणे युनेस्कोने इंटरनॅशनल हेरिटेज साईट्स म्हणून घोषित केली आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणचा शोध हा ब्रिटिशांनी लावला होता. असे सांगितले जाते कि ज्यावेळी हनुमानला दैवी वनस्पती संजीवनी एका पर्वतावरून आणायला सांगितली होती तो भूभाग म्हणजेच हि फुलांची दरी. चहूकडे उंचउंच पर्वत, सर्वत्र हिरवळीची झालर आणि त्यावर हि रंगीबेरंगी विस्तृत अशी फुलांची दरी ६०० पेक्षा जास्त नानाविध प्रकारची फुले तसेच औषधी वनस्पती आच्छाद तुम्हाला सर्वत्र दिसेल, अनेक सायंटिस्ट येथे या वनस्पतीचा अभ्यास करण्यासाठी परदेशातून येतात आणि म्हणतात कि आम्ही कधी देवावर विश्वास नाही ठेवला पण येथे आल्यावर आम्हाला देवांच्या स्वर्गाची अनुभूती होते. खरोखरच अलौलिक आणि विस्मयकारी ठिकाण या उत्तराखंडमध्ये आहे. प्रत्येक ४ तासाने येथे हवामान बदल होतो म्हणजे पाऊस-उन्हाचा, ढगांचा खेळ येथे रोजच चालूच असतो. त्यामुळे सर्व तयारीनिशी या ठिकाणाला भेट द्यावी. पाऊस पडल्यानंतर ढगांचा समुदाय या भूभागावर स्वार होतो तो नजारा विलक्षण सुखदायी असतो. या सर्वांसोबत तुम्ही येथे सोनेरी हरणे, विविध रंगाची आणि प्रकारची फुलपाखरे, बर्फाळ चित्ते देखील बघू शकता. नंदादेवी हे ठिकाण नैसर्गिकदृष्या अतिशय सुंदर असल्याने हजारो निसर्गप्रेमी आणि गिरीप्रेमी या ठिकाणाला भेट देणे पसंद करतात.

यहुदी उपासनागृहे

केरळ हे ज्यू सिनेगॉग म्हणजेच यहुदी उपासनागृहांचे ठिकाण आहे. वास्तुकलेचे उत्कृष्ट नमुने म्हणून या उपासना गृहांकडे बघितले जाते. एकूण ८ लोकप्रिय सिनेगॉग येथे आहेत. त्यापैकी परदेशी सिनेगॉग हे फारच लोकप्रिय असे सिनेगॉग आहे. फारसे धार्मिक महत्व नसल्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना या वास्तू  बघण्याची मुभा आहे. अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे काही सिनेगॉग नष्ट झालेत तर काही दुरुस्त करण्यात आले आहेत. परदेशी कलाकृतींचे वस्तूदर्शन विशेषतः ज्यु संस्कृतीचे दर्शन तुम्हाला याच ठिकाणी होईल. याव्यतिरिक्त माला सिनेगॉग, चेंडमंगलम सिनेगॉग, परावूर सिनेगॉग, कडावुंभगम एर्नाकुलम सिनेगॉग, थखुंभगम एर्नाकुलम सिनेगॉग, कडावुंभगम मॅटनचेरी सिनेगॉग, थखुंभगम मॅटॅनचेरी सिनेगॉग या सर्वांना आपण भेटी देणार आहोत.

Ranjana Kokane