Top
  >  Blog Featured   >  बहरीन- जगातील सुंदर प्राचीन संस्कृती आणि निळ्याशार समुद्रातील धाडसी स्कुबा डायविंग

बहरीन- जगातील सुंदर प्राचीन संस्कृती आणि निळ्याशार समुद्रातील धाडसी स्कुबा डायविंग

फॉरेन टूर किंवा सुट्ट्यांमध्ये बाहेर जायचे असेल तर सिंगापूर, दुबई, पॅरिस किंवा न्यूयॉर्क अशा ग्लॅमरस ठिकाणांचे आकर्षण प्रत्येकाला असते. दुबईचे तर फारच. साधारणतः ४० टक्क्यांपेक्षाही जास्त भारतीय दुबईमध्ये कामधंद्यानिमित्त आहेत कारण तेथे रोजगाराच्या संधी भरपूर आहेत. आलिशान गगनचुंबी इमारती,सुंदर मॉल्स,बीचेस अशा अनेक गोष्टींमुळे ते एक आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून देखील आहे. परंतु बहुतेक आकर्षक ठिकाणे हि कृत्रिमरीत्या बनविलेली आहेत, जसे कि पाम जुमीराह आणि दुबई मिरॅकल गार्डन हे कृत्रिम द्वीप आहेत. बहुतेक अरब देश हे समुद्र तटाशी असल्याने तेथे निसर्गसौंदर्य भरभरून पाहावयास मिळते. अरब देशांमध्ये बहरीन हा टिकलीएवढा अगदी दिल्लीपेक्षाही छोटासा मिडल ईस्ट आशियाई देश आहे. ३३ छोट्या छोट्या आइसलँडचा मिळून हा छोटासा टुमदार देश आहे.बहरीन म्हणजे दोन समुद्रांमधील प्रदेश. ५००० वर्षांपूर्वीचा सांस्कृतिक वारसा या देशाला लाभलेला आहे. अगदी भारतातील सिंधू संस्कृतीपासून भारत आणि बहरीनमध्ये देवाण घेवाण आहे. बहरीन हा अरब मधील एकमेव देश आहे जेथे पूर्णतः स्वच्छ पिण्यायोगे नैसर्गिक पाणी मिळते. जे दुबईसारख्या विकसित भागातदेखील मिळत नाही.

आधुनिक आणि पुरातन अरब संस्कृतीचा अनोखा संगम तुम्हाला फक्त बहरीन मध्येच बघायला मिळेल. बहरीनमध्ये पर्यटकांना नानाविध पक्ष्यांचे वाईल्डलाईफ, सुंदर समुद्र किनारे, पाण्यातील विविध प्रकारचे खेळ, सर्वात लोकप्रिय स्कुबा डायविंग, घोडेस्वारी तसेच सोने अलंकार आणि आकर्षक सजावटीच्या वस्तू शॉपिंगसाठी आकर्षित करत आहेत. दूरवर पसरलेल्या विलोभनीय समुद्रकिनाऱ्यांमुळे बहरीनला मध्य पूर्वेचा दागिना संबोधला जातो. अरबची खाडी म्हणजेच बहरीनची राजधानी मनामा हे प्राचीन काळापासूनच व्यापार उद्योग मार्गाचे केंद्र आहे. बहरीन राष्ट्रीय संग्रहालय हे प्राचीन ‘दिलमून संस्कृती’ सभ्यता दाखविते. या शहरातील संपन्न असे ‘बाब-ए-बहरीन’ सूक मध्ये हाताने बनविलेले रंगीबेरंगी कपडे, मसाले तसेच ओरिजनल पर्ल्स मोत्यांचे डिझाइनेबल दागिने येथे मिळतात.

येथे समुद्री वन्यजीवन फार विशाल आहे आणि हेच पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण केंद्र बनले आहे. हावर द्वीप, मशान द्वीप, अराद बे, तुबली बे, आणि अल अरीन लाइफस्टाइल पार्क बघण्यासारखी सुंदर स्थळे आहेत. ग्रेटर फ्लॅमिंगो म्हणजेच राजहंस येथे मोठ्या प्रमाणात आहेत. बाहरीनमध्ये साधारणतः ३३० पक्षांच्या जाती अदधळतात. छोटे – छोटे रंगीबेरंगी पक्षी बघण्यासाठी देखील पर्यटक येथे येतात.

या देशाला भेट दिल्यानंतरच तुम्हाला येथील समृद्ध गौरवशाली संस्कृतीचे ज्ञान मिळेल. येथील पुरुष ड्रम आणि इतर वाद्याच्या तालावर अगदी बेभान नाचतात. हा डान्स बऱ्याच प्रमाणात गुजराती गरब्यासारखा वाटतो त्यामुळे बघायला मज्जा वाटते. संग्रहालये आणि कलात्मक शिल्पे बघितल्यानंतर येथील लोकांची रचनात्मक दृष्टी समजते. येथे ‘अल्फ अल फलाह’ मस्जिद वास्तू कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर बिल्डिंग हि जगातील लोकप्रिय आणि एकमेव आधुनिक कलेचा नमुना म्हणून गणली जाते. या बिल्डिंगचे डिझाईन पवनचक्क्यांनी जोडून बनविलेले आहे ज्यामुळे शहराला मुबलक प्रमाणात विजेचा पुरवठा येथून केला जातो.

बहरीनच्या विस्तृत वाळवंटात एक अद्भुत झाड आहे, ज्याचं नाव ”ट्री ऑफ लाईफ” असे आहे, एवढ्या विस्तृत महाकाय वाळवंटात कुठेही पाण्याचा थेंब आढळत नाही आणि तरीही हे झाड कित्येक वर्षांपासून हिरवेगार आणि पसरलेले आहे. अगदी जादू असलेले हे झाड बघण्यासाठी देश – विदेशातून लोक येथे येतात.

दक्षिण बहरीनच्या समुद्री भागामध्ये स्कुबा डायविंग प्रसिद्ध आहे. निळ्याशार समुद्रात खोलवर समुद्रातील आकर्षक रंगीबेरंगी आणि नानाविध प्रकारचे जग जीवन तुम्हाला येथे अनुभवयास मिळते जे दुबईसारख्या ठिकाणी मिळणार नाही. रिफ आइसलँड या ठिकाणी ही अद्भुत दुनिया पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारचे मासे, समुद्रातील उंच सखल भूभाग, वनस्पती जीवन आणि विशेषतः येथे प्रत्यक्षात समुद्रातून मोती कसे मिळविले जातात हे देखील समुद्रात जाऊन बघता येते. येथे जगातील सर्वात मोठे अंडरवॉटर थीम पार्क सुरु करण्याचे नुकतेच जाहीर केले आहे. या पार्कमध्ये बोइंग-747 विमान देखील पाण्याखाली असणार. या अनोख्या प्लॅनमुळे येथील पर्यटनाला अधिक चालना मिळणार आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान असलेले हवामान पर्यटनासाठी अनुकूल असते. एकटे किंवा फ्रेंड्स, सहकुटुंब टूर्स बुक करून तुम्ही येथे जाऊ शकता आणि येथील पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटू शकता कारण या ठिकाणी जाण्याची संधी तुम्हाला इज इंडिया ट्रॅव्हल देत आहे. त्वरा करा आणि बहरीनच्या समृद्ध संस्कृतीला भेट द्या तसेच स्कुबा डायविंगचा यथेच्छ आनंद आवर्जून घ्या.

Ranjana Kokane October 1, 2019